Sunday 27 February 2022

वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यात मराठी भाषेचे योगदान महत्वाचेः सरोजकुमार मिठारी









पाचगणीः जागतिक स्तरावर  मराठी भाषेतील साहित्य हे कथा,कविता,लेख,कादंबरी आदी साहित्य प्रकारातून लिहिले जात आहे.जगातील अनेक देशात मराठी भाषा बोलली जाते.मराठी भाषेने वाचन संस्कृती,साहित्य संमेलने,दिवाळी अंकाची परंपरा टिकवून ठेवली.अशा मराठी भाषेचा गौरव व जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाईचे विद्याव्यासंगी सहाय्यक संपादक व प्रसिध्द लेखक सरोजकुमार मिठारी यांनी केले.
      श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज पाचगणी व गिरिस्थान कला व वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्र्वर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित " मायबोली मराठी " या विषयावरील आॅनलाईन व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.यावेळी प्राचार्य डाॅ.चंद्रकांत कदम,मराठी विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,डाॅ.एस.बी.रणदिवे,डाॅ.वामन सरगर,प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      प्र.प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले,ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.मराठी भाषेत विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती झालेली आहे.भारतातील मराठी भाषा ही प्रमुख भाषेपैकी एक आहे.समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार्‍या जनजागृती चळवळीत सहभागी होवून मराठी भाषेचा गौरव करावा.
       प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डाॅ.अनंता कस्तुरे यांनी करून दिला. केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.एस.सी.नालबंद  यांनी मानले.आॅनलाईन व्याख्यानास प्राध्यापक व विद्यार्थी व मराठी भाषाप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment