Tuesday, 27 September 2022
महेता काॅलेजमध्ये " युवा महोत्सव व व्यक्तिमत्व विकास " विषयावर कार्यशाळा संपन्न
श्रीमती मीनलबेन महेता काॅलेज पाचगणीमध्ये मराठी विभाग व युवा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ अग्रणी काॅलेज योजने अंतर्गत " युवा महोत्सव व व्यक्तिमत्व विकास " या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.प्रमुख पाहुणे प्रसिध्द नाट्य लेखक व दिग्दर्शक प्रा.जोतीराम आंबवडे , मिरज हे होते.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डाॅ.अनंता कस्तुरे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.प्रियांका कुंभार यांनी केले.आभार डाॅ.सुनिता गित्ते यांनी मानले.कार्यशाळेस प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Thursday, 22 September 2022
Tuesday, 6 September 2022
महेता काॅलेजमध्ये पाचगणीचा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन
महेता काॅलेजमध्ये पाचगणीचा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन
पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये डाॅ.सुनील पवार लिखित पाचगणीचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ,ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे,मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,पोलीस निरीक्षक सतीश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते व प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभाग व इतिहास विभागाच्यावतीने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.वेळेकामठी गावचे सुपूत्र प्रा.डाॅ.सुनील दिनकर पवार यांच्या पाचगणीचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास (सन 1910 ते 1985) या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ,ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे,मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,पोलीस निरीक्षक सतीश पवार,महाबळेश्र्वर तालुका समन्ववय समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे होते.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.युवा उद्योजक प्रकाश गोळे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमर बिरामणे,लाल बहादुर शास्री काॅलेजचे मराठी विभागप्रमुख डाॅ.अशोक तवर,डाॅ.एस.एम.पवार,मराठी विभागप्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,इतिहास विभागप्रमुख डाॅ.सुनिता गित्ते,प्रा.माणिक वांगीकर,प्रा.रेश्मा देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती .
प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ म्हणाले,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील गुरूदेव कार्यकर्ता पाचगणीतील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक इतिहासावर संशोधन करून पुस्तक प्रकाशित करतो ही बाब संस्थेसाठी व समाजासाठी प्रेरणादायी आहे.या पुस्तकात पाचगणी व परिसरातील दिलेली नेमकी माहिती खर्या अर्थाने पाचगणीची ओळख करून देते.प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.डाॅ.सुनील पवार यांचे पाचगणीवरील संशोधन हे पाचगणीच्या माहितीचा खजिना आहे.
प्रसिध्द साहित्यिक जगन्नाथ शिंदे गुरूजी म्हणाले,डाॅ.सुनील पवार यांचे पाचगणीचा इतिहास हे संशोधनात्मक पुस्तक हे सत्यतेवर अवलंबून असलेने ते प्रमाणित आहे.हे पुस्तक शहरवासियांना,पर्यटकांना व अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.पाचगणीतील अनेक ज्ञात अज्ञात गोष्टी समजण्यास मदत होणार आहे.
प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले, महाविद्यालयात पाचगणीचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिध्द होतो आहे याचा अभिमान आहे.पर्यटक,विद्यार्थी,नागरिक या सर्वांना उपयुक्त ठरणारे असे पुस्तक आहे.डाॅ.सुनील पवार यांनी पाचगणीचा इतिहास लिहून नवोदितांना प्रेरणा दिली आहे.
यावेळी लेखक डाॅ.सुनील पवार,मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,पोलीस निरीक्षक सतीश पवार,समन्वय समितीचे अध्यक्ष प्रविण भिलारे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमर बिरामणे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक डाॅ.सुनिता गित्ते यांनी केले.सूत्रसंचालन प्रा माणिक वांगीकर यांनी केले.आभार डाॅ.अनंता कस्तुरे यांनी मानले.कार्यक्रमास प्राध्यापक ,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Friday, 10 June 2022
Saturday, 23 April 2022
पुस्तक वाचनामुळेच व्यक्तिमत्वाची जडणघडण होतेः प्रा.शितल पवार
महेता काॅलेजमध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा
व्याख्यान व पुस्तक प्रकट वाचन स्पर्धांचे आयोजन
पाचगणीः प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत पुस्तकाचे वाचन महत्वाचे ठरीत असते.पुस्तक वाचनातूनच ज्ञान ,प्रगती व उंची प्राप्त होत असते.जीवनाला सर्वांगिण आकार देण्याचे काम पुस्तके करतात.यासाठी प्रत्येकांनी पुस्तक वाचनातून व्यक्तिमत्वाची जडणघडण करावी असे मत प्रा.शितल पवार यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्यावतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.यावेळी पुस्तक वाचनाचे महत्व या विषयावरील व्याख्यानात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ.सतीश देसाई होते.यावेळी ग्रंथालय विभागप्रमुख प्रा.राजेंद्र खंडाईत,मराठी विभागप्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे,प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डाॅ.सतीश देसाई म्हणाले,जीवनात वाचनाला खूप महत्व आहे.वाचनामुळेच जगातील सर्व ज्ञान व माहिती प्राप्त होते.महात्मा गांधी,अरूदंती राॅय,डाॅ.अब्दुल कलाम,वि.स.खांडेकर,विश्र्वास नांगरे पाटील यांची पुस्तके प्रत्येकांनी वाचावित.पुस्तक वाचल्याशिवाय जगात काहीच मिळत नाही त्यामुळे युवकांनी काॅलेज जीवनातच विविध विषय व विविध साहित्य प्रकारची पुस्तके वाचावित.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे व पुस्तकांचे पूजन करण्यात आले.यानिमित्ताने पुस्तक प्रकट वाचन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेचे उद् घाटन प्राचार्य डाॅ.सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.परीक्षण इंग्रजी विभागप्रमुख प्रा.जयंत शिंदे,प्रा.नितीन वाघमारे यांनी केले.
प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय डाॅ.अनंता कस्तुरे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत यांनी मानले.कार्यक्रमास डाॅ.सलीम पठाण,प्रा.प्रशांत सुतार,डाॅ.अलीम जाफर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
























































