Sunday, 23 August 2026
Wednesday, 22 October 2025
मराठी विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी
विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई
यांच्या सयुंक्त
विद्यमाने
वाचन प्रेरणा दिन निमित्त
निबंध लेखन,पुस्तक परीक्षण व चित्रपट परीक्षण स्पर्धा
श्रीमती मीनलबेल
मेहता कॉलेज, पाचगणी मराठी विभाग व विश्वकोश निर्मिती मंडळ वाई यांच्या संयुक्त
विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह व मराठी वाचन प्रेरणा दिन या निमित्त निबंध
लेखन ,पुस्तक परीक्षण व चित्रपट परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
निबंध लेखन स्पर्धेमध्ये विराज उमेश परामने बी.ए भाग -२ या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने “ मराठी असे आमची मायबोली ” या विषयावर निबंध लिहिला. द्वितीय क्रमांक रिद्धी गणेश पिसाळ बी.कॉम - भाग एक हिने ” कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज “ या विषयावर निबंध लिहिला.
या स्पर्धा प्राचार्य डॉ. सतीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या .स्पर्धा संयोजन करण्यासाठी मराठी विभागाचे प्रा. माणिक वांगीकर, प्रा. रमेश कुमार कोळेकर यांचे सहकार्य लाभले. परीक्षण डॉ.सुनील खोत, प्रा. ऋषिकेश इनामदार, प्रा. जी गाडेकर यांनी केले.या स्पर्धा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यास वाव मिळाला तसेच विद्यार्थ्यांनी निबंधाच्या माध्यमातून स्वतःचे अनुभव मानले तसेच पुस्तक व चित्रपट परीक्षण करून एक परीक्षक म्हणून त्यांनी मांडलेली मते महत्त्वाची ठरली.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Monday, 4 March 2024
Tuesday, 27 February 2024
Saturday, 20 January 2024
Friday, 19 January 2024
Tuesday, 12 December 2023
Monday, 4 September 2023
महेता काॅलेजमध्ये शिक्षक दिन साजरा
श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती प्रतिमा पूजन व व्याख्यान या उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संतौष कवी,प्राचार्य डाॅ.सतीश देसाई ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.अनंता कस्तुरे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.
मा.संतोष कवी म्हणाले,डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी तसेच देशाच्या सर्वांगिण विकासासाठी दिलेले योगदान सर्वांना आदर्शवत आहे.सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
प्रास्ताविक डाॅ.अनंता कस्तुरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.लोमेशकुमार कोळेकर यांनी केले.आभार डॉ. आक्रम मुजावर यांनी मांडले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

























































