Wednesday 16 October 2019

NEWS : घरोघरी वाचन संस्कृती जपायला हवीःसुरेश देशपांडे



प्रमुख पाहुणे सुरेश देशपांडे मार्गदर्शन करताना



अध्यक्षीय भाषण प्राचार्य डाॅ.अरूण गाडे
पाहुण्यांचे स्वागत
प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांचे स्वागत
प्रास्ताविक - डाॅ.वामन सरगर
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
उपस्थित विद्यार्थी






घरोघरी वाचन संस्कृती जपायला हवीः सुरेश देशपांडे

पाचगणीः साहित्य हे समाजाला दिशा देण्याचे काम करते. साहित्य वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होतो.जीवनाला आकार देणारी वाचन संस्कृती घरोघरी जपायला हवी असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषद डोंबवलीचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक सुरेश देशपांडे यांनी व्यक्त केले.
     पाचगणी येथे श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने  मराठी वाड्.मय मंडळ उद् घाटन व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी डाॅ.वामन सरगर व प्रा.माणिक वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,महाविद्यालयीन काळात युवकांनी वाचन,लेखन,भाषण व संभाषण या कलांचा विकास करायला हवा.वाचनामुळे व्यक्तिमत्व व अभिरूची समृध्द होते त्यामुळे तरूणांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा.
        या कार्यक्रमात सुरेश देशपांडे यांनी जप्ती ही विनोदी कथा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.प्रास्ताविक डाॅ.वामन सरगर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.माणिक वांगीकर यांनी केले.आभार प्रा.नरेंद्र फडतरे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment