Sunday 13 October 2019

NEWS :पाचगणीत काॅलेज कट्ट्यावर रंगला वाचन कट्टा

 






 पाचगणीत काॅलेज कट्ट्यावर रंगला वाचन कट्टा

          वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपक्रम,
           वाचन कट्ट्यावर वाचन,भाषण व                        कवितांचे सादरीकरण

पाचगणी: श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या ग्रंथालय विभागाने काॅलेज कट्ट्यावरच वाचन कट्ट्याचे आयोजन करीत वाचन प्रेरणा दिन वेगळ्या उपक्रमाने साजरा केला.या उपक्रमात काॅलेज कट्ट्यावरील विद्यार्थ्यांनी उत्सर्फूपणे सहभागी होत पुस्तक वाचन,भाषण,गीत व कवितांचे सादरीकरण केले.या उपक्रमांमुळे काॅलेज कट्टा वाचन कट्ट्यात चांगलाच रंगला.
     महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.यानिमित्ताने वाचन कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे होते.यावेळी प्रा.यू.बी.जाधव,ग्रंथपाल प्रा.राजेंद्र खंडाईत,प्रा.संतोष निलाखे,प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे,प्रा.नरेंद्र फडतरे,डाॅ.शहाजी जाधव,पंढरीनाथ भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
   वाचन कट्ट्याचे उद् घाटनप्रंसगी प्राचार्य डाॅ.अरूण गाडे म्हणाले,ग्रंथालय विभागाचा वाचन कट्टा हा उपक्रम उल्लेखनिय व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्वाचा विकास करणारा आहे.विद्यार्थ्यांनी वाचन,लेखन,भाषण व संभाषण कौशल्याचा विकास करून विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन करावे.
    वाचन कट्ट्यावर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकातील उतारा व लेखांचे वाचन व मराठी व हिंदी गीतांचे व कवितांचे सादरीकरण केले.डाॅ.अब्दुल कलाम,वाचनाचे महत्व आदी विषयांवर भाषणही केले. 
     संयोजन प्रा.राजेंद्र खंडाईत,प्रा.संतोष निलाखे, प्रा.डाॅ.प्रियदर्शनी कांबळे,पंढरीनाथ भिलारे यांनी केले.प्रास्ताविक किशोरी गोळे हिने केले.सूत्रसंचालन सरिता चोपडे हिने केले.आभार मयुरी मालुसरे हिने मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment