Sunday 13 October 2019

NEWS : डाॅ.वामन सरगर यांचा Ph.D पदवी प्राप्त केलेबद्दल सत्कार







डाॅ.वामन सरगर यांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केलेबद्दल सत्कार

 पाचगणीः श्रीमती मीनलबेन महेता काॅलेजच्या मराठी विभागातील प्रा.डाॅ.वामन सरगर यांचा शिवाजी विद्यापीठाची मराठी विषयातील पीएच.डी पदवी प्राप्त केलेबद्दल प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
    डाॅ.वामन सरगर यांनी " मराठी काव्यनिर्मिती आणि 1990 नंतरच्या कवितेचे रूपविशेष " या विषयावरचा प्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर केला.त्यांना विद्यापीठातील मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ.नंदकुमार मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.डाॅ.वामन सरगर यांनी एम.ए,बी.एड,एम.फिल,सेट या पदव्या यापूर्वीच प्राप्त केल्या आहेत.त्यांचे 18  शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत.
    पाचगणीतील महेता काॅलेजमध्ये डाॅ.वामन सरगर यांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केलेबद्दल प्राचार्य डाॅ.अरूण गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.डाॅ.अरूण गाडे म्हणाले, डाॅ.सरगर यांनी केलेले मराठी कवितेतील संशोधन समाजाला व साहित्याला दिशा देणारे व समाजउपयोगी आहे.समीक्षक व वाचक त्यांच्या संशोधनाची नक्की दखल घेतील.नवोदित प्राध्यापकांनीही त्यांचा आदर्श घेवून आपापल्या विषयातील संशोधन करावे व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा.
   यावेळी डाॅ.बी.एम.कोकरे, डाॅ.जी.एस.बोत्रे,प्रा.जे.व्ही.शिंदे,प्रा.एस.पी.कुदळे,डाॅ.शहाजी जाधव,प्रा.अनंता कस्तुरे,प्रा.माणिक वांगीकर यांनी मनोगत व्यक्त करून डाॅ.सरगर यांना शुभेच्छा दिल्या.डाॅ.सरगर यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.जे.व्ही.शिंदे यांनी केले.आभार प्रा.अनंता कस्तुरे यांनी आभार मानले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment